Site icon Lokpress

रंजित निंबाळकर सर यांच्यावर गौतम भैय्या काकडे यांनी केला गोळीबार |

Share

नमस्कार मित्रांनो  बैलगाडा क्षेत्राला काळीमाप फासणारी घटना निंबूत येथे घडली आहे. बैल व्यवहाराच्या वादातून काल बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक म्हणून ओळख असणारे गौतम भैया काकडे रणजीत निंबाळकर यादोघांमध्ये बाचाबाची होऊन गोळीबार झालाय. आता या गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी-विक्री असं सांगण्यात येतंय . काही दिवसांपूर्वी गौतम भैया काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांच्याकडून सुंदर नावाचा बैल घेतला होता. त्या बैलाची उर्वरित रक्कम घेण्यासाठी निंबाळकर हे गौतम गौतम भैया यांच्या घरी आले होते.  त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय असं सांगण्यात येत आहे पण बैलगाडा क्षेत्रासाठी मात्र ही फार दुर्दैवी घटना आहे.  असं बोललं जातंय मागे एकदा राहुलभाई पाटील आणि पंढरीशेठ फडके यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतीतील खुंशी वरून गोळीबार झाला होता आणि आता ही घटना त्यामुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून गेलंय म्हणूनच नेमकं काय घडलंय निंबूत मध्ये गौतम भैया काकडे आणि रणजीत निंबाळकर यांच्यात नेमका कशावरून वाद झाला आहे पुढे पाहूया ,


गौतम भैया काकडे बैलगाडा शर्यती मधलं एक प्रसिद्ध नाव या ना त्या कारणानं गौतम भैया शर्यत क्षेत्रात चर्चेत असतात.  नंद्या छोटा लक्षा सर्जा ही काही सुप्रसिद्ध बैल गौतम भैयांच्या धावणीला होती.  मागे गौतम भैया काकडे यांनी बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली होती, त्यावेळेस त्यांनी सबंध शर्यत क्षेत्राचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं . त्याच दरम्यान त्यांनी आपला सर्जा नावाचा बैल विकायला काढलेला होता.  आता ज्या दिवशी हा सगळा निवृत्तीचा विषय झाला त्याच रात्री त्यांनी आपला सर्जा हा बैल फलटणच्या ज्ञानज्योती करिअर अकॅडमीचे संस्थापक रणजीत निंबाळकर सर आणि सुप्रसिद्ध विठ्ठल ड्रायव्हर भुतकर यांना दिला ,म्हणजे ज्या दिवशी गौतम भैयांनी आपली बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली, त्याच दिवशी रात्री हा व्यवहार झाला होता.  पण आता हा व्यवहार कितीला झाला होता याबाबतीतली माहिती निंबाळकर सर विठ्ठल ड्रायव्हर आणि गौतम भैया यांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नव्हती.  पण  पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार हा व्यवहार साधारण 61 लाख रुपयांचा होता असं बोललं जातंय त्यावेळेस बैलगाडा क्षेत्रातला सर्वात मोठा व्यवहार असल्याचं सुद्धा अनेकांकडून बोललं गेलं.  या व्यवहाराची सोशल मीडियावर देखील भरपूर चर्चा झाली त्यानंतर रणजीत निंबाळकर सर आणि गौतम भैया काकडे यांच्यात सगळं आलबेल होतं.  अगदीच निंबाळकर सरांनी बऱ्याच वेळा गौतम भैयांचं कौतुक देखील केलं होतं आता आपण काल रात्री गौतम  भैया काकडे यांच्या घरी नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया तर बघा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणजीत निंबाळकर यांनी एक वर्षांपूर्वी निंबूत येथील गौतम भैया काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना सर्जा हा बैल विकत घेतला होता.  त्यानंतर 24 जून रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम भैया काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला होता, त्यावेळी गौतम भैया काकडे यांनी आधी पाच लाख रुपये दिले होते.  मात्र त्यांच्याकडून उर्वरित 32 लाख रुपयांची रक्कम येणं बाकी होतं दरम्यान हा व्यवहार झाला त्याच दिवशी गौतम भैया काकडे आणि संतोष तोडकर यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातल्या बुध येथूनत्यांच्या निंबुत येथील घरी आणला . खरं तर उरलेले 32 लाख घेण्यासाठीच रणजीत निंबाळकरहे काल सकाळीच निंबुतला गेले होते पण पैसे मिळाले नाहीत म्हणून काल रात्री 11 वाजता 32 लाख देतो म्हणून गौतम भैया काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांना घरी बोलावून घेतलं त्यानंतर रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता मुलगी अंकुरण वैभव भारत कदम पिंटू प्रकाश जाधव हे चार चाकीतून निंबूत ला गौतम भैया यांच्या निवासस्थानी गेले घरासमोरील बाजेवर बसल्यावर गौतम भैया यांनी मी पैसे देत नाही असं सांगितलंय का मी तुम्हाला सकाळी पैसे देतो आता स्टॅम्प वर सही करा असं म्हटलं यावर रणजीत निंबाळकर यांनी राहिलेले सगळे पैसे द्या नाहीतर इसार परत देतो माझा बैल मला परत द्या असं म्हटलं यावर गौतम भैया यांनी बैल कसा घेऊन जातो तेच बघतो ,असं म्हणत गौरव काकडे आणि तीन पोरांना बोलावून घेतलं काठी उगारत शिवीगाळ केली त्याच वेळी गौरव यांनी बैल कसा नेतो ते बघतो ,म्हणत त्यांच्याकडील पिस्तुलातून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली.  आता ज्या बंदुकीतून हा गोळीबार झालाय त्या बंदुकीचे लायसन्स गौतम भैया यांच्या वडिलांच्या नावावर असून गौरव यांच्यासहित त्या दोघांना पोलिसांनी आता अटक केली आहे.  रणजीत निंबाळकर हे सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावरती पुण्यातीलखाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शेवटची ज्योत मावळली आहे.  रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी पोलिसात फिरयाद दिली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत मंडळी तसं पाहिलं तर बैलगाडा शर्यत ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शर्यत शौकिनांच्या करमणुकीचा सर्वात मोठा कणा आजच्या घडीला महाराष्ट्रात या खेळाचे लाखो चाहते आहेत . पण मागच्या काही दिवसात या खेळाला कोणाची नजर लागली आहे काय माहिती खेळामध्ये अतिरिक्त पैसा खेळू लागल्यामुळे आता शर्यतीतला आनंद मागे पडून त्यात अहंकाराने प्रवेश केलाय परिणामी छोट्या छोट्या गोष्टींवरून बैलगाडा मालक चालकांमध्ये शर्यत चौकिनांमध्ये वाद झाल्याच्या घटना ठीक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.  जी की बैलगाडा क्षेत्रासाठी ही गोष्ट चांगली चांगली नाही या आधीच्या आणि आत्ताच्या गोळीबाराची घटना ही त्या वादाची परिसीमा आहे असाच सूर आता काही जणांकडून आळवला जातोय काही लोक या दोन्ही गोळीबारांचे कारण बैलगाडा क्षेत्र नसून त्यांचे वैयक्तिक वाद आहेत . असं स्पष्टीकरण देतात पण तरीही कुठेतरी हा बैलगाडा क्षेत्रालालागलेला काळा डाग आहे हे नाकारून चालणारनाही खरं तर खेळ खेळाच्या जागी आणिवैयक्तिक वाद व्यवहार व्यवहाराच्या जागीराहिले पाहिजेत पण संबंधित घटनेबद्दल नेमकं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करूननक्की सांगा

 

Exit mobile version